Friday 4 July 2014

भटक्या जमाती (Nomadic tribes)





 भटक्यांचे प्रामुख्याने दोन भाग पाडता येतील, एक गट जो केवळ जातीने भटक्यामध्ये मोडतो पण काळाच्या ओघात स्थायिक झाला आहे, परंपरागत व्यवसाय सोडून दिलेला आहे व बऱ्यापैकी प्रगत आहे, आणि दुसरा गट आहे जो आजही परंपरागत व्यवसायामुळे भटकत आहे, भूमिहीन आहे आणि सर्वच बाबतीत फारच मागास आहे.
 व्यवसायानुसार भटक्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते: उत्पादक काम करणारे; सेवा कर्म करणारे, करमणूक करणारे, उत्पादक काम करणारे भटके हे गुरे आणि गुरांपासून मिळणारी उत्पादके (लोकर,हाडे,आणि कातडी), तसेच गुरांची विक्री किंवा त्यांची देवाण-घेवाण (अदलाबदल) यांवर आपली गुजराण करतात. कळपातील गुरांच्या गरजांशी त्यांचे भटकेपण निगडित असते. गुरांना चरण्यासाठी आवश्यक असलेल्या कुरणांच्या शोधात ते भटकतात. एका कुरणातील गवत संपले, की दुसरऱ्या कुरणाकडे ते वाटचाल करतात. हे भटके भारतात हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील भरपूर कुरणांच्या प्रदेशात आढळून येतात. चांगपास आणि बाकरवाल ही त्यांची ठळक उदाहरणे देता येतील. गुरांच्या कळपापासून मिळणारऱ्या उत्पान्नास पूरक उत्पन्न शिकार, मासेमारी,औषधी वनस्पती आणि कंदमुळे गोळा करणे यांपासून मिळते. सेवाकर्म करणारे भटके हे धान्य, मीठ आणि इतर वस्तू ज्या ठीकाणी स्वस्त उपलब्ध असतील तेथून खरेदी करतात आणि ज्या ठिकाणी त्या वस्तू दुर्मिळ असतील,तेथे थोडाफार नफा घेउन विकतात. तसेच दोर, चटया तयार करणे आणि विकणे, औषधे विकणे, लोहारकाम करणे, मोलमजुरी करणे; चाकू, सुरी, कात्री यांना धार लावणे इ. कामेही ते करतात. अशा प्रकारचे भटके हे भारतात बंजारा, लमाण, बेलदार, गाडुला, घिसाडी-लोहार, शिकलगार म्हणून परिचित आहेत. कर्नाकातील बुडुबुडीकी, गोंधळी आणि जोशी घरोघरी जाऊन भविष्य कथन व मदारी सर्पाचा खेळ, डोबांरी तारेवरची कसरत, नंदी वाले बैलांचा खेळ आणि काही जादूचे प्रयोग करतात. या मार्गांनी लोकांची करमणूक करणारे भटके उत्पादक व सेवाकर्म करणाऱ्या भटक्याहून भिन्न असून त्यांपैकी नॅटस, कालबेलिया आणि जोगी हे सर्पांचा खेळ करून पोट भरणारे आहेत. अशा लोकांना पूर्वि गावोगावी अन्नधान्य, जुने कपडे इत्यादी मोबदला म्हणून मिळत असे. (साभार : मराठी विश्वकोष)
 आजघडीला ह्या गटाची परिस्थिती ही दलितांपेक्ष्याही दयनीय आहे. आज २१ व्या शतकात वाढत्या औद्योगिककरणमुळे भटक्या जमातीतील लोक पार रसातळाला गेल्या आहेत, भटक्या विमुक्तांच्या पिढ्यानपिढ्या बरबाद होत चालल्या आहेत. अवस्था इतकी वाईट आहे कि अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा सुद्धा व्यवस्थितपणे भागवायच्या म्हंटले तरी अवघड होऊन बसले आहे त्यामुळे शिक्षण, राजकारण, व त्यांची औद्योगिक प्रगती ह्या तर फार लांबच्या गोष्टी...

-      सचिन शेंडगे (Mob – 9860324384, Email – S.A.SHENDGE@GMAIL.COM)

Wednesday 26 February 2014

भटके विमुक्तांची कैफियत



 भारतीय समाजरचनेत स्पृश्य, अस्पृश्य, आदिवासी यांच्यानंतर चौथाही एक समाजघटक आहे. तो म्हणजे भटक्या आणि विमुक्त जमाती. आजघडीला देशातील १३ कोटी भटक्या विमुक्तांना मूलभूत हक्कासाठी झगडावे लागत आहे, त्यातल्या त्यात पुरोगामी(?) महाराष्ट्रात तर अतिशय दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्रात विमुक्त जमातींत १४ गुन्हेगार जमाती आणि २८ भटक्या जमाती आहेत आणि त्यांची अवस्था दलितांपेक्ष्याही अतिशय बिकट बनली आहे. रेणके आयोगाने सादर केलेल्या अहवलानुसार ९८ टक्के भटके विमुक्त भूमिहीन, ९४ टक्के भटक्यांना बीपीएल कार्ड नाही, ९८ टक्के भटके बँक कर्जापासून वंचित, ५७ टक्के पालात राहतात, ७२ टक्के भटक्यांना रेशनकार्ड नाही, २८ टक्के भटक्यांना स्मशानभूमी नाही. आज डांसबारमधील बारबाला, वेश्या व्यवसाय, रस्त्यावरील भिकारी, कचरा गोळा करणारया लोकांमध्ये भटके विमुक्तांची संख्या हि सर्वात अधिक आहे.

 २००९ साली लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीतून महाराष्ट्रातून भटक्या जमातीमधून फक्त एक खासदार निवडून आला आहे आणि त्यापेक्ष्याही विदारक चित्र म्हणजे विमुक्त जमातीमधून एकाला सुद्धा निवडून देण्याची दया ह्या पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने नाही. भटक्या विमुक्त जमातीमधील थोडाफार तरुण वर्ग आज शिक्षणाची कास धरत आहे परंतु तिथेही त्याला शिष्यवृत्ती सारख्या अनेक हक्काच्या सवलती मिळवण्यासाठी ६५ वर्षांपूर्वीचा जातीचा पुरावा मागितला जातो. आपल्या कुटुंबाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीच्या तरुण किंवा तरुणीला  ६५ वर्षांपूर्वीचा जातीचा पुरावा कुठून उपलब्ध होईल हा आजवर न सुटलेला प्रश्न आहे? 

 काहीना हि अतिशोयोक्ती वाटेल पण बहुतांश भटके विमुक्तांना आजही म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतर अन्न, वस्त्र व निवारा मुलभूत गरजासाठी झगडावे लागत आहे. आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे भारतात हि परिस्थिती सुधारण्यासाठी अंमलबजावणी तर फार दूरची गोष्ट, साधी दखलही घेतली जात नाही...


-          सचिन शेंडगे (Mob – 9860324384, Email S.A.SHENDGE@GMAIL.COM)